BANNER

The Janshakti News

मुख्यमंश्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ



सांगली , दि. 10, (जि. मा. का.) : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास दि. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.

 

 वयवर्षे 65  त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्वअशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधनेउपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्रयोगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास शासनाकडू मान्यता देण्या आलेली आहेया योजनेच्या पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न खात्यावर तीन हजार रूपये एकदाच वर्ग करण्या येणार आहेत.

              सांगली जिल्ह्याअंतर्गत ग्रामीण तसेच तालुका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांकडू अर्ज मागविण्यात येत सू अर्जासोबत आधार कार्ड झेरॉक्सउपकरण हवे असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्रजन्म तारखेचा पुरावादोन फोटोराष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्सउत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.

             या योजनेसाठी दाखल करावयाचा अर्ज विनामुल्य आहेअर्ज ग्रामीणस्तरावर ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक तसेच नजिकच्या अंगणवाडी सेविकाआशा वर्करयांच्याकडे उपलब्ध आहेतमहानगरपालिकेअंतर्गत वैद्यकिय आरोग्य अधिकारी (दवाखाना), सांमिकुशहर महानगरपालिकाआशा वर्कर यांच्याकडे तसेच नगरपालिकानगरपंचायतस्तरावर मुख्याधिकारी तथा त्यांनी नेमू दिलेले नोडल अधिकारी यांच्याकडे अर्ज उपलब्ध आहेत.  अर्जात नमुद केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन परिपूर्ण अर्ज त्यांचेकडेच जमा करावा, असे आवाहनही श्री. उबाळे यांनी केले आहे.








🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


➡️ https://youtube.com/@thejanshakatinews5707

➡️ https://www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰