BANNER

The Janshakti News

पलूस येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालय करण्यास हिरवा कंदील ; आमदार अरुण लाड व क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या प्रयत्नांना यश



     आमदार अरुण लाड , प्रतिक्रिया

क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड , प्रतिक्रिया



पलूस : आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी पलूस येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार अरुण लाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला व त्यास अखेर यश मिळाले. 
             पलूस तालुक्याची एकूण लोकसंख्या २ लाख १० हजार इतकी आहे. त्यात पलूस येथे १ ग्रामीण रुग्णालय तसेच कुंडल व भिलवडी येथे प्रत्येकी १ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. सद्यस्थितीत पलूस याठिकाणी ओ.पी.डी. सरासरी रुग्णसंख्या ही ३०००, आंतरुग्ण संख्या प्रति महिना ३००, तसेच अपघात व गंभीर रुग्णसंख्या प्रति महिना १२० इतकी आहे. यातील गंभीर रुग्ण स्थलांतरित करावयाचे झाल्यास जिल्हा रुग्णालय, सांगली हे ३८ कि.मी. अंतरावर असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे अतिरिक्त रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यामध्ये अडचण निर्माण होत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या सगळ्या परिस्थितीची माहिती आमदार अरुण लाड व शरद लाड यांनी करून दिली. आरोग्याच्या दृष्टीने तसेच रुग्णांच्या सोयीच्यादृष्टीने ग्रामीण रुग्णालय, पलूसचे विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मागणी सुद्धा यावेळी आमदार अरुण लाड व क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्यावतीने करण्यात आली. उपमुख्यमंत्री महोदयांनी सदर मागणीवरून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या या विषयाबाबत सकारात्मक विचार करून विशेष बाब म्हणून कार्यवाही करावी, असा शेरा दिला. यानंतर संपूर्ण पाठपुरावा करून आज मंजुरीचा आदेश मिळाला आहे.
                 अखेर आमदार अरुण लाड व शरद लाड यांच्या सातत्यपूर्ण अशा प्रयत्नाने पलूसच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात लवकरच रूपांतर होणार असून तालुक्यातील रुग्णांना आता सांगली ऐवजी जवळच तालुक्याच्या ठिकाणी पलूस येथे सर्व उपचार उपलब्ध होणार आहेत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰