भिलवडी दि. 22 : पलूस-कडेगांव तालुक्यातील वाडी-वस्ती व शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचवण्यासाठी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे. त्यासाठी आम्ही नेटानं आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहोत. या मतदारसंघाच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी केले.
अंकलखोप जिल्हा परिषद गटातील अंकलखोप, संतगाव, सूर्यगाव, नागठाणे, आमणापूर, विठ्ठलवाडी येथील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पृथ्वी मल्टीपर्पज हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्यासह अंकलखोप जिल्हा परिषद गटातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते म्हणाले, शेतकरी, व्यापारी, महिला यांच्या अडचणी ध्यानात घेऊन त्यांच्यासाठी काम करायचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीकोनातून पावलं उचलली जात आहेत.
डॉ. कदम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वांनी ताकदीने काम करण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी अंकलखोप येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰