yuva MAharashtra कासेगाव शिक्षण संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन इस्लामपूर , प्राचार्य मा. नाकिब रियाज मुजावर यांचा पालकांनी केला सत्कार ...

कासेगाव शिक्षण संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन इस्लामपूर , प्राचार्य मा. नाकिब रियाज मुजावर यांचा पालकांनी केला सत्कार ...




सांगली : इस्लामपूर येथील कासेगाव शिक्षण संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन मध्ये गेले तीन वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रातील नर्सिंग विषयाचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केले. सोमवार दिनांक  ०७/१०/२०२४  रोजी सर्व विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून घरी परतताना, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचे प्राचार्य मा. नाकिब रियाज मुजावर सर यांनी आणि त्यांच्या सहकाऱी प्राध्यापकांच्या अतोनात प्रयत्नाने आणि विद्यार्थ्यांची काळजी घेवून, आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण दिले, वैद्यकीय क्षेत्रात शिस्त व नियम, रुग्णसेवा, वक्तशीरपणा आणि वैद्यकीय अभ्यासक्रमा बाबत सखोल ज्ञान देऊन आदर्श नागरिक बनवून रुग्णांची सेवा करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकत्र येऊन संस्थेचे प्राचार्य मा. नाकिब रियाज मुजावर सर यांच्या सत्कार केला.


त्याचबरोबर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी, उप प्राचार्या परवीन मोहम्मद शेख,
प्रा. महेश नारायण बोधे, प्रा.मोनिका दिपक पाटील, प्रा. सुषमा अगस्ती, प्रा. तेजश्री अरुण सातपुते, प्रा. प्रतीक्षा प्रदीप पाटील, प्रा. नम्रता साळुंखे या सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका यांचे पालकांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य, उप प्राचार्या आणि प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, तीन वर्षे GNM नर्सिंग विषयाचे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्याने विद्यार्थ्यांना भविष्यातील पुढील आयुष्यासाठी नव्याने होत असलेल्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . 
यावेळी, संजय कांबळे, अनिल मोरे, प्रकाश पवार, अनिल भोळे,  शेखर भोळे, अनिल शिंदे, बंदेनवाज राजरतन, परशुराम बनसोडे, शमशुद्दीन सय्यद, विलास कोरे यांच्या बरोबर पालक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰