yuva MAharashtra भिलवडीत " ५८ वा वाचन कट्टा '' ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान..

भिलवडीत " ५८ वा वाचन कट्टा '' ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान..



भिलवडी : केवळ पाठ्यपुस्तके वाचून परीक्षेतील अपेक्षित प्रश्नांची उत्तरे लिहिल्याने खरे शिक्षण पूर्ण होत नाही. म्हणूनच त्याला अवांतर वाचनाची मजबूत जोड द्यायला हवी. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्‍यक असल्याने केवळ पाठ्यपुस्तके वाचून परीक्षेतील अपेक्षित प्रश्नांची उत्तरे लिहिल्याने खरे शिक्षण पूर्ण होत नाही. म्हणूनच त्याला अवांतर वाचनाची मजबूत जोड द्यायला हवी. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्‍यक असल्याने केवळ पाठ्यपुस्तके वाचून परीक्षेतील अपेक्षित प्रश्नांची उत्तरे लिहिल्याने खरे शिक्षण पूर्ण होत नाही. म्हणूनच त्याला अवांतर वाचनाची मजबूत जोड द्यायला हवी. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्‍यक असल्याने पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सुप्रसिध्द उद्योजक स्व. काकासाहेब चितळे यांनी सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे सुरु करण्यात आलेल्या ' वाचन कट्टा ' उपक्रमांतर्गत सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेच्या वतीने ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी रोजी ५८ वा वाचन कट्टा संपन्न झाला.



या वाचन कट्टा उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष व चितळे उद्योग समूहाचे सुप्रसिद्ध उद्योजक गिरीश चितळे होते.

प्रारंभी वाचन कट्टा संयोजक व कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले आणि एक ऑक्टोबर रोजी ग. दि. माडगूळकरांची जयंती चे औचित्य साधून ग दि माडगूळकरांचे साहित्य हा विषय निवडल्याचे सांगितले.

याप्रसंगी ह.रा.जोशी, डी. आर. कदम, कुमार चौगुले, संजय पाटील सर, प्रमोद कुलकर्णी, हकीम तांबोळी, रमेश चोपडे, मेजर उत्तम कांबळे, हनुमंतराव शिंदे, जी जी पाटील गुरुजी, यांच्यासह अनेक वाचकांनी ग. दि. माडगूळकरांच्या कथा, कविता, कादंबरी, लावणी, देशभक्तीपर गीते, बालगीते आधी साहित्याचा मागोवा आपल्या मनोगतात घेतला.



कार्यवाहक सुभाष कवडे यांनी देखील ग.दि. माडगुळकरांच्या साहित्य विषयी व विशेषतः बालकवितांच्या विषयी माहिती दिली.

यावेळी जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जी. जी. पाटील गुरुजी. ह.रा. जोशी. ए.के. चौगुले नाना या ज्येष्ठ वाचकांचा ग्रंथ भेट देऊन गिरीश चितळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.



वाचन कट्ट्याचे संयोजन ग्रंथपाल वामन काटीकर, विद्या निकम, मयुरी नलवडे, माधव काटीकर या ग्रंथालयाच्या सेवकांनी उत्तम प्रकारे केले.

शेवटी सुभाष कवडे यांनी आभार मानून एक नोव्हेंबर चा 59 वा वाचन कट्टा माझे ऑक्टोबर महिन्याचे वाचन हा विषय घेण्यात आल्याचे सांगितले.

या वाचन कट्ट्यावर सर्व बरेच ग्रंथ प्रेमी व वाचनालयाचे सभासद उपस्थित होते. प्रमोद कुलकर्णी यांनी गायलेल्या गीतरामायणातील काही गीतांना उपस्थितानी उत्तम प्रकारे दाद दिली.

=============================


➡️ https://youtube.com/@thejanshakatinews5707

➡️ https://www.theJanShaktiNews.in


=============================