yuva MAharashtra महाराष्ट्र राज्य किसान सभेची पलूस येथे बैठक ; उसाला टनाला पाच हजार रुपये दर घेणारच...

महाराष्ट्र राज्य किसान सभेची पलूस येथे बैठक ; उसाला टनाला पाच हजार रुपये दर घेणारच...



                                VIDEO 





पलूस : सध्या साखर हंगाम सुरू होणार आहे. कारखान्या ची धुराडे पेटण्याच्या स्थितीत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही.
 शेतकऱ्यांच्या उसाला टनाला पाच हजार रुपये भाव घेण्याचा निर्णय पलूस येथील बैठकीत झाला.सांगली जिल्ह्यातील ऊस,सोयाबीन, द्राक्ष पिकांच्या बाबतीत किमान हमीभाव निश्चित करून घेणेबाबत,  शेतीसाठी लागणारे पाण्याचे नियोजन करणे व आपल्या भागातील प्रमुख पीक असलेल्या ऊस दराबाबत चर्चा करून ऊस परिषद घेण्यासंदर्भात  किसान सभेच्या बैठकीत चर्चा झाली.


 यंदा उसाला टनाला पाच हजार रुपये दर मिळालाच पाहिजे.ही प्रमुख मागणी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी मांडली.  किसान सभेचे वैभव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी 
शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे विटा,प्रकाश जावीर विटा,विष्णू शिसाळ पलूस,नंदकुमार हत्तीकर कुंडल, वैभव पवार कुंडल, शेतकरी सेनेचे भागवत सुतार, हरून मगदूम, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे  पोपट मोरे, शिवाजी पवार, भारती कम्युनिस्ट पक्षाचे संग्राम थोरबोले,आकाराम शिसाळ, भीमराव जाधव  यांनी भूमिका मांडली.यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰