BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणीचे चेअरमन शरद लाड यांची इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी निवड




 कुंडल दि. ०८ : साखर उद्योगातील अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याची धुरा मागील वर्षी ११ जुलै २०२३ रोजी सर्व संचालकांच्या एक मताने शरद लाड यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आले. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाकडून दिला जाणारा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार तसेच राष्ट्रीय सहकारी साखर संघ, नवी दिल्ली यांचा गाळप हंगाम २०२२-२३ चा 'सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन' पुरस्कार असे अनेक पुरस्कार जाहीर झाले. 


गतवर्षीच्या हंगामात सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस गाळप करून सहकार क्षेत्रात कारखान्याचे नाव अधिक ठळकपणे उमटवण्यात शरद लाड यांना यश आल्याचे दिसले. मागील ११ वर्षांपासून कारखान्याच्या कार्यप्रणालीचा चढता आलेख चेअरमन शरद लाड यांच्या कार्यकाळातही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
 इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया हे इथेनॉल निर्मिती करणारे खाजगी तसेच सहकारी साखर कारखाने व सरकार यांच्यामधील एक प्रमुख दुवा म्हणून काम करते आहे. असोसिएशनच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाची मा. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी उदय सभागृह, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि. अकलूज येथे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शरद लाड यांची नूतन संचालकपदी निवड करण्यात आली.


या निवडीनंतर शरद लाड म्हणाले, या नवीन जबाबदारी बद्दल असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. असोसिएशन व इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्सच्या प्रश्नासंदर्भात असोसिएशन करत असलेल्या कामामध्ये भविष्याकाळात माझ्याकडून चांगले योगदान देण्यात देईल, असा विश्वास यानिमित्ताने आपणाला देतो. 
सदर कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व संबंधित सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰