सांगली, दि. 16 (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामे करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी यांच्या कामकाजाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आचारसंहिता कक्ष ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे आदिंसह आठही विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, समन्वय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यांनी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून करावयाच्या आवश्यक कार्यवाहीबाबत, नेमण्यात आलेल्या विविध पथकांकडून करावयाच्या कार्यवाही बाबतचा सविस्तर आढावा घेतला. त्याचबरोबर आदर्श आचारसंहितेचे पालन करणे, विविध कार्यान्वित पथके आणि त्यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक त्या सूचनाही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना केल्या. तसेच, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याबाबतची विविध अनुषंगिक सूचना यावेळी करण्यात आल्या.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
➡️ https://youtube.com/@thejanshakatinews5707
➡️ https://www.theJanShaktiNews.in
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰