yuva MAharashtra जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली येथे ज्येष्ठ नागरीकांसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली येथे ज्येष्ठ नागरीकांसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न




सांगली : दि. 8 (जि.मा.का.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगलीविजयनगर सांगली येथे सामाजिक न्याय दिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमा प्रमुख वक्ते म्हणून विधिज्ञ ॲड. श्रीमती. मुक्ता दुबे व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. व्ही.एम. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.


अँड श्रीमती मुक्ता दुबे यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना त्यांना असणारे कायदे व अधिकारी याची माहिती दिली. जेष्ठ नागरिकांनी आपली तक्रारअर्ज कोणत्या विभागाला सादर करावा व कशाप्रकारे सादर करावा याचे मार्गदर्शन केले. तसेच जेष्ठ नागरिकांना आपल्या उत्तरत्या वयामध्ये जास्तीत जास्त आनंदी कशा प्रकारे रहाता येईल याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आपली तब्येतीची काळजी घेवून निरोगी आयुष्य जगण्याबाबत सल्ला दिला.             अतिरिक्त सरकारी वकील ॲड. व्ही. एम. देशपांडे यांनी मराठी भाषेला नुकताच मिळालेल्या अभिजात दर्जा बाबत मार्गदर्शन केले. मराठी भाषेचे महत्व पौराणिक काळापासून कसे आहे व मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषेचे किती प्रकार आहेत व त्या कशाप्रकारे बोलल्या जातात याबाबत उदाहरणासहित उपस्थितांना मागदर्शन केले. या कार्यकमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल मोकाशी यांनी केलेआभार नितीन आंबेकर यांनी मानले. कार्यकमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली चे अधिक्षक न. वि. दांडेकर व विधी सेवेचे कर्मचारी यांनी केले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


➡️ https://youtube.com/@thejanshakatinews5707

➡️ https://www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰