yuva MAharashtra महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : एमपीएससी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 163 लागू

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : एमपीएससी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 163 लागू



 

        सांगली, दि. 28 ‍(जि. मा. का.) : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सन-2024 ही दि. 1 डिसेंबर 2024 रोजी सांगली, सांगलीवाडी येथील एकूण 24 हायस्कूल / महाविद्यालयांच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजीचे सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

            आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यासएकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परीक्षा वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिनटेलिफोन बुथफॅक्स मशिनध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परीक्षा केंद्रात मोबाईलपेजर नेण्यास मनाई केली आहे.

            परीक्षा केंद्रे पुढीलप्रमाणे - सिटी हायस्कूल, गावभाग, सांगली, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, विश्रामबाग, सांगली, श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली, संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट टिळकनगर, वानलेसवाडी, मिरज, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीवाडी, सांगली हायस्कूल सांगली, मोहम्मदिया अँग्लो उर्दु उच्च विद्यालय व कला व विज्ञान शालेय कनिष्ठ महाविद्यालय, सांगली, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली, विलिंग्डन कॉलेज, विश्रामबाग, सांगली, राणी सरस्वती कन्या स्कूल, पेठ भाग, सांगली, श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, सांगली, श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल, शिवाजीनगरसांगलीसौ. लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालय सांगलीवाडीजी. ए. हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजहरभट रोडसांगलीचिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्सविश्रामबागसांगलीगणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्ससांगलीमातोश्री गंगामा शिवाजी कोठारी गुजराथी विद्यालय आणि ज्यु. कॉलेजमहावीरनगरसांगलीप्रज्ञा प्रबोधिनी प्रशाळाविश्रामबागसांगलीसौ. के. बी. दमाणी हायस्कूलचांदणी चौकाजवळसांगलीसांगली हायस्कूल व श्री. विनोद शिवाजी भाटे आर्टस्सायन्स व कॉमर्स ज्यु. कॉलेजआमराईजवळसांगलीमातोश्री सायराबाई चंपालाल बेथमुथाज्यू कॉलेजरिसाला रोडखणभागसांगलीश्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयनेमिनाथनगरसांगलीकै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशालागणेशदुर्गराजवाडासांगलीहि. हा. रा. चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलगणेशदुर्गराजवाडासांगली.

             हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰