सांगली, दि. 21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी सांगली जिल्ह्यात सरासरी 72.12 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी जिल्ह्यातील आठ मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे. 281-मिरज - 66.07 टक्के, 282-सांगली - 62.78 टक्के, 283-इस्लामपूर - 74.71 टक्के, 284-शिराळा - 78.57 टक्के, 285-पलूस-कडेगाव - 79.02 टक्के, 286-खानापूर - 71.27 टक्के, 287-तासगाव-कवठेमहांकाळ - 74.99 टक्के व 288 जत विधानसभा मतदारसंघात 72.38 टक्के इतके मतदान झाले.
मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. यासाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰