सांगली, दि. 16 (माध्यम कक्ष) : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान बुधवार, दि. 20 नोव्हेंबर व मतमोजणी शनिवार, दि 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने या दोन्ही दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार तसेच इतर कोणत्याही गावात / ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास अशा एकूण 123 गावातील आठवडा बाजार, पुढे ढकलण्यात येवून ते अनुक्रमे दि. 21 नोव्हेंबर व 24 नोव्हेंबर 2024 रोजी भरविण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पारित केले आहेत.
जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान बुधवार, दि. 20 नोव्हेंबर व मतमोजणी शनिवार, दि 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी एकूण 123 गावात आठवडा बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात एकत्र जमाव गोळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदान व मतमोजणी शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वत्रिक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता मतदान व मतमोजणी सुस्थितीत पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. मार्केट ऍन्ड फेअर्स ऍक्ट 1862 (सन 1862 चा मुंबई कायदा क्रमांक 4) च्या कलम 5 व 5अ, अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान व मतमोजणीच्या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार तसेच इतर कोणत्याही गावात / ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास सदर आठवडा बाजार, पुढे ढकलण्यात येवून ते अनुक्रमे दि. 21 नोव्हेंबर व 24 नोव्हेंबर 2024 रोजी भरविण्याचे आदेश दिले आहेत.
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰