yuva MAharashtra विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : सहकारी संस्थांमध्ये विविध उपक्रमांव्दारे मतदार जनजागृती

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : सहकारी संस्थांमध्ये विविध उपक्रमांव्दारे मतदार जनजागृती



       सांगलीदि. 18 (माध्यम कक्ष) : सहकारी संस्थांच्या सभासदांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये मतदान करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार व पणन विभागामार्फत मतदार जनजागृतीचे उपक्रम सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हास्तरीय स्वीप समितीचे सदस्य मंगेश सुरवसे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.



            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचनेनुसार विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी सांगली जिल्ह्यातील 7 कृषि उत्पन्न बाजार समिती, 20 नागरी सहकारी बँकाजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, 1026 नागरी/ग्रामीण पतसंस्था, 180 सेवक पतसंस्था, 780 विकास सोसायटी, 363 गृहनिर्माण सोसायटी, 12 साखर कारखाने इतक्या सहकारी संस्थांचे संचालक मंडळअधिकारी/कर्मचारी वर्गसंस्थेचे सभासद यांच्यामध्ये मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.



मतदान करण्याबाबत मतदानाची ई प्रतिज्ञा संस्थांमध्ये घेण्यात आली. संस्थेमार्फत मतदार जागृती पोस्टर व बॅनर तयार करुन संस्थेच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. तसेच बँकापतसंस्थाकृषि उत्पन्न बाजार समिती यामध्ये व्यवहार करणारे सभासदशेतकरी यांना देण्यात येणाऱ्या पावत्यांवर मतदान करण्याबाबतचा शिक्का मारण्यात येऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कृषि उत्पन्न बाजार समित्यासर्व प्रकारच्या संस्थांचे संचालक मंडळकर्मचारीसभासद यांच्यामार्फत मुक्त व निःपक्षपणे मतदान करुन लोकशाही सदृढ व समृध्द करण्याची प्रतिज्ञा घेण्यात येत आहे. 



सांगली जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठी साधारणतः 8 लाख 50 हजार सभासदांना व इतर नागरी सहकारी बँकामार्फत 50 हजार सभासदांना अशा एकूण 9 लाख सभासदांना मतदान करण्याबाबतचे आवाहन करणारे एसएमएस पाठविण्यात आले होते. त्याचप्रकारे आता देखील विधानसभा निवडणूक 2024 साठी सहकारी बँकांच्या सर्व सभासदांना एसएमएस पाठविण्याचे सुरु असून सहकार व पणन विभागामार्फत सुमारे 10 लाख सभासद मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰