सांगली, दि. 05 (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी व कर्मचारी यांची दुसरी सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी सर्वसाधारण निरीक्षक शानवास एस., सर्वसाधारण निरीक्षक कुलदीप शर्मा, सर्वसाधारण निरीक्षक एजाज अहमद भट, सर्वसाधारण निरीक्षक दीपक जेकब, नोडल अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासिन पटेल उपस्थित होते.
श्री. पटेल यांनी सरमिसळबाबत सादरीकरण केले. मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांची तीन प्रशिक्षणे घेण्यात येणार आहेत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰