सांगली, दि. 8 (माध्यम कक्ष) : विधानसभा निवडणूक 2024 साठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. यासाठी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी बॅलेट युनिट यंत्रांची संगणकीकृत प्रथम पूरक सरमिसळ जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली व राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.
दिनांक 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीनंतर 287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एका बॅलेट युनिटवर NOTA सह 16 उमेदवारांची नावे समाविष्ट होत असल्यामुळे या मतदारसंघात अधिकच्या बॅलेट युनिट साठी प्रथम पूरक संगणकीकृत आज करण्यात आली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदि अधिकारी उपस्थित होते.
सरमिसळ प्रक्रियेनंतर मालगाव येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे राजकीय पक्ष प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शासकीय गोदाम उघडण्यात आले. अधिकचे लागणारे बॅलेट युनिट 287-तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात पाठविण्यात येत असून यांची दुसरी सरमिसळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व विहित कार्यपद्धतीप्रमाणे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. उमेदवार / उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी निवडणूक प्रक्रियेबध्दलची सर्व माहिती संबंधितांकडून वेळोवेळी होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहून घ्यावी. निवडणूक विषयक प्रक्रियेची सर्व माहिती /मार्गदर्शक सूचना मा. भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध असून या सूचनांनुसारच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ईव्हीएम सरमिसळ, पोस्टल बॅलेट, होम वोटिंग, सर्व्हिस वोटर आदींबाबत सविस्तर माहिती दिली. वोटर स्लीप सर्व मतदारांना पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले असून जर कोणास वोटर स्लीप मिळाली नसेल तर बुथ लेव्हल एजंट यांनी संबंधित बीएलओशी संपर्क साधून याबाबत माहिती घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰