भिलवडी : पलूस - कडेगांव मतदारसंघातील प्रत्येक माणसांचा डॉ.पतंगराव कदम यांना आशिर्वाद होता. आता त्याच पद्धतीने तुम्ही आशिर्वाद, पाठिंबा आणि बळ आ.डॉ.विश्वजीत कदम यांना देण्याची साद भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम यांनी ग्रामस्थांना घातली.
भिलवडी, माळवाडी, भिलवडी स्टेशन, भुवनेश्वरवाडी येथे डॉ.शिवाजीराव कदम यांनी भेट दिली. माळवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेबरोबर संवाद साधला.
ते म्हणाले, डॉ.पतंगराव कदम मंत्री असताना त्यांनी जे खाते मिळेल तिथे चांगले काम केले. त्यांच्या पाठीशी तुम्ही सदैव होता. पलूस तालुक्यात मतदान नेहमीच जास्त असते. येथील कुठलीही समस्या असेल तर त्याचे तात्काळ निराकरण करू असे सांगितले.
ते म्हणाले, तुम्हा सर्वांना भेटून आनंद झाला. हा आनंद हृदयात कायम कोरला जाईल. भिलवडी आणि परिसरातील बारा वाड्यांशी असणारी माझी नाळ कायम अशीच राहील.
साहेबांचे काम सर्वांनी पाहिले आहे. मतदारसंघातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून
भारती हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बांधण्याचा निर्णय झाला. आरोग्य सेवा उत्तम पद्धतीने चालू आहे.
पतंगराव कदम यांचे अनेक किस्से सांगत
परिवर्तन करण्याचे काम भारती विद्यापीठाने केल्याचे स्पष्ट केले.
आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी मोठ्या प्रमाणात निधी या मतदारसंघाच्या विकासासाठी दिला आहे. त्यातून अनेक कामे मार्गी लागली आहेत. आता पलूस कडेगांवचा कायापालट करू असा निश्चय डॉ.शिवाजीराव कदम यांनी केला.
दरम्यान सकाळी ज्येष्ठ नेते स्व. आनंदराव भाऊ मोहिते व लोकनेते स्व.संग्राम दादा पाटील यांना अभिवादन करून ग्रामस्थांच्या भेटीस प्रारंभ करण्यात आला. आज आमदारकीला दोन्ही नेते पाहिजे होते अशी खंत डॉ.शिवाजीराव कदम यांनी व्यक्त केली. भारती विद्यापीठाला नॅकचा A++ चा दर्जा मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
भुवनेश्वरवाडीत अंबाबाईचे दर्शन घेऊन भक्तांशी संवाद साधला.
ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की,
कदम कुटुंब म्हणजे आमच्या दृष्टीने वैभव आहे. विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असतात. आमचा डॉ.विश्वजीत कदम यांना पाठिंबा आहे.
यावेळी कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील.
ॲड. जगन्नाथ माळी,
बी.डी.पाटील, डी.आर.कदम, सहदेव कदम, विजय चोपडे, युवा नेते पृथ्वीराज पाटील, प्रतिक संग्राम पाटील, रघुनाथ देसाई, डॉ.आप्पासाहेब चोपडे, चंद्रकांत पाटील, मोहन तावदर यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰