भिलवडी दि. १८ : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत या सरकारला लोकांनी दणका दिला. त्यामुळे यांना लाडकी बहिण आठवली. परंतू या जनतेला
लाडकी नको तर धाडसी बहिण पाहिजे. जी पलूस कडेगांव मतदारसंघात स्वतःच्या पायावर उभी राहिल. अन् ती स्वावलंबी बनेल असे स्पष्ट मत आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.
माळवाडी येथील प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. दरम्यान येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावातून पदयात्रा काढली.
आ.डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात
हा विश्वजीत कदम तुम्हाला कुणासमोर झुकू देणार नाही. त्यामुळे
कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. फसवणूकीला सामोरे जावू नका. या गोष्टींमुळे महाराष्ट्र मागे गेला आहे.
मतदारसंघातील विरोधक महापूर आणि कोरोनात कुठे होते असा सवाल करत मी माळवाडी गावाला १० कोटींचा निधी दिला आहे. खोटे बोलत पण रेटून बोल ही वृत्ती त्यांची आहे.
ते म्हणाले, मतदारसंघात हजारो तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मतदारसंघाचे नाव हिंदुस्थानच्या नकाशावर नेण्यासाठी मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन केले. स्व. डॉ.पतंगराव कदम यांनीही या माळवाडी गावावर प्रचंड प्रेम केले आहे.
कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यातील जोश पाहून असे वाटले की हे स्वागत आहे की विजयाची सभा आहे.
एक वेगळे वातावरण आहे. ही मंडळी विरोधकांना जोरदार करंट देणार आहे. येथे विविध विकासकामे केली आहेत. गोरगरीब लोकांची शैक्षणिक सोय केली. सामाजिक, राजकारण करताना मतदारसंघातील चौफेर विकास केला.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰