yuva MAharashtra जत येथील आचारसंहिता भंगप्रकरणी तक्रारीचा खुलासा

जत येथील आचारसंहिता भंगप्रकरणी तक्रारीचा खुलासा

सांगली दि. 19 : जत येथील आचारसंहिता कक्षाकडे दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी पुढीलप्रमाणे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती.

याबाबत 288-जत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अजयकुमार नष्टे यांनी दिलेला खुलासा पुढीलप्रमाणे.

            दिनांक 19/11/2024 रोजी मौजे सोन्याळ, ता. जत येथे विना नंबर असलेल्या गाडीतून पैसे वाटप होत असल्याचे आचारसंहिता कक्षाकडे दुपारी 12.16 वाजता प्राप्त तक्रारीनुसार भरारी पथक क्रमांक 3 मार्फत दुपारी 12.38 वाजता तपासणी केली असता सोन्याळ फाटा जागेच्या ठिकाणी KIGER RENAULT या कंपनीच्या डिक्कीमधील प्लास्टीक फाईलमध्ये 500 च्या 59 नोटा एकूण रक्कम रुपये 29500, लग्न पत्रिका व कपडे या व्यतिरिक्त आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचा अहवाल सादर केला आहे.

सदर विना नंबर असलेल्या गाडीची झाडाझडती व तपासणी (1) श्री. शिवप्रभु चमाण्णा तेली (2) श्री. अनिल साहेबाना हळ्ळी रा. सोन्याळ, ता. जत या पंचाच्या समक्ष तपासणी करण्यात आली आहे. सदर ठिकाणी आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा अहवाल भरारी पथक यांनी सादर केला आहे. तसेच विना नंबर प्लेट असल्यामुळे गाडीवर नंबर प्लेट नसल्यामुळे र. रू. 3500/- उमदी पोलीस ठाणे यांचेकडून दंडाची कार्यवाही करण्यात आली आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰