पलूस दि. ०६ : २८५ पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. संग्राम संपतराव देशमुख यांना आरपीआय (अ) गटातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कडेगाव-पलूस विधानसभा मतदार संघाचे प्रवासी प्रभारी विधानपरिषद शासनाचे माजी मुख्य सचिव मा. श्री.महांतेशा कवठगीमठ यांच्या प्रमुख जाहीर पाठिंबा दिला.
या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)पलूस तालुका अध्यक्ष मा. बोधीसत्व माने, कडेगांव तालुका अध्यक्ष मा. जितेंद्र सोरटे, पलूस तालुका उपाध्यक्ष मा.देवदास कोकळे, कडेगांव तालुका उपाध्यक्ष मा.भिकाजी मिसाळ, पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल तिरमारे, विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष शितल मोरे, माजी जिल्हाध्यक्ष राजेश तिरमारे, तालुका कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे , पंकज गाडे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰