yuva MAharashtra ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी पी राधाकृष्णन



 

            मुंबईदि. 30 : एनसीसीमधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतोत्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी एनसीसीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.  



           एनसीसीच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरणया विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेत्यावेळी राज्यपाल बोलत होते. महाराष्ट्र एनसीसी संचालनालय व एचएसएनसी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे चर्चासत्राचे आयोजन केले होते. 



            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनसीसीच्या विस्ताराबाबत सूचित केले आहे. यादृष्टीने जास्तीत जास्त युवक-युवतींनी एनसीसीमध्ये आपला सहभाग वाढवला पाहिजे असे सांगून एनसीसीमुळे शिस्तपालनाचे महत्व कळते व देशभक्तीची भावना जोपासली जाते असे राज्यपालांनी सांगितले.  

            शिस्त नसली तर यश मिळत नाही त्यामुळे युवकांनी शिस्तअंगी बाणवली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. युवक-युवतींनी दिवसातील किमान 15 मिनिटे योग व ध्यानधारणेसाठी दिल्यास त्यांची एकाग्रता शक्ती वाढेल असे सांगताना युवकांनी मोबाईलवरील वेळ नियंत्रित ठेवला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. 



            चर्चासत्राला एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंहएचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ.निरंजन हिरानंदानीसर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीनमहासंचालक सशस्त्र सैन्य दल वैद्यकीय महाविद्यालयदिप्ती चावलाअतिरिक्त सचिवसंरक्षण मंत्रालयएचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.हेमलता बागलाएनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग तसेच सैन्य दलातील अधिकारीजवान व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐      www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰