yuva MAharashtra जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण



 

        सांगलीदि. २९ (जि. मा. का.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या आदेशाने दिनांक 14 नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत जात पडताळणी समित्यांमध्ये विशेष मोहीम राबवून जात वैधता प्रमाणपत्राचे यथाशीघ्र निर्गमन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मागील पंधरा दिवसांमध्ये विशेष मोहीम राबवून जवळपास दोन हजार जात वैधता प्रमाणपत्र वितरित केली आहेतही माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी दिली.



या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात समितीचे पोलीस उपाधीक्षक संजय गिड्डे, पोलीस निरीक्षक श्रीमती कोळेकरसंशोधन अधिकारी मेघराज भाते व इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय विभागाच्या सांगली जिल्ह्यातील सहाय्यक संचालक श्रीमती अंबुरे यांच्या हस्ते जाती वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰