yuva MAharashtra ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीची बैठक संपन्न



 

सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणार्थ असलेल्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात ही बैठक झाली. बैठकीस ज्येष्ठ नागरिक संघातर्फे यशवंतराव चव्हाण, आर. ए. देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रतिनिधी डॉ. वैशाली पाटील, सहाय्यक आयुक्त नगरपालिका शाखा अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका आकाश डोईफोडे, एस. डी. भांबुरे, सतीश कुंभार, सहायक आयुक्त समाजकल्याण नितीन उबाळे आदिंसह समितीचे सदस्य उपस्थित होते.



जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे. त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, यासाठी राज्य शासनाने सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी विरंगुळा केंद्र, समस्या निवारण केंद्र स्थापन करणे तसेच पोलिस स्टेशनच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करावेत. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढाव्यात, असे निर्देश डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिले.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰