सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांकरिता परिवहन विभागाने वाहनांसाठी आवडीचा क्रमांक (चॉईस नंबर) निवडण्याची सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. ही माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
संपूर्ण राज्यात 25 नोव्हेंबरपासून ही सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे नवीन वाहनांसाठी चॉईस नंबरचे आरक्षण तसेच पैसे भरण्यासाठी आता वाहन खरेदी करणाऱ्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागणार नाही. आता ही सेवा पूर्णपणे फेसलेस करण्यात आली आहे.
असा निवडा चॉइस क्रमांक
- फॅन्सी परिवहन संकेतस्थळावर जाऊन मोबाईल आणि ई-मेलच्या मदतीने ओटीपी मिळवून रजिस्ट्रेशन करा (fancy.parivahan.gov.in/fancy)
. - उपलब्ध असलेल्या चॉईस क्रमांकामधून आवडीचा क्रमांक निश्चित करा.
- त्याचे पैसे ऑनलाईन पेमेंट गेट-वेच्या मदतीने भरा.
- ई-पावतीची प्रिंट काढून वाहन विक्रेत्याकडे सादर करा.
- 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
- 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰