yuva MAharashtra " ऊस शेतीमध्ये यांत्रिकीरणाचा वापर आवश्यक" ... आमदार अरूण (अण्णा) लाड.

" ऊस शेतीमध्ये यांत्रिकीरणाचा वापर आवश्यक" ... आमदार अरूण (अण्णा) लाड.


 क्रांतीमार्फत यंत्रचलित बाळ भरणी औजाराचे प्रात्यक्षिक


बलवडी दि. ०६ : ऊस हे शेतक-यांचे एकमेव शाश्वत पिक आहे. ऊस लागवडीवरील खर्चात बचत करून उत्पादन वाढविण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर करणे आवश्यक असलेचे मत क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार अरूण लाड यांनी व्यक्त केले. क्रांती 
कारखाना व स्वदेश ग्रुप पुणे यांचे संयुक्त प्रयत्नातून विकसीत केलेल्या
यांत्रिक बाळ भरणी औजाराच्या प्रात्यक्षिकावेळी ते बोलत होते.


 यावेळी कारखान्याचे चेअरमन शरद लाड, संचालक संग्राम जाधव, जितेंद्र पाटील, 
दिलीप थोरबोले, अशोक विभुते, माजी संचालक संदीप पवार, दिनकर लाड, अशोक पवार, सुनिल पाटील, विनोद देशमुख, सुनिल सावंत, दिलीप जाधव, संभाजी पाटील, सुनिल महाडिक, नितीन माने, सुनिल भोसले, माजी सरपंच प्रविण पवार, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.


यावेळी ते पुढे म्हणाले, ऊसातील
बाळ भरणी हे महत्त्वाचे आंतरमशागतीचे काम आहे. बाळभरणीमुळे ऊसाची जोमदार वाढ होते व गाळपायोग्य ऊस संख्या वाढलेमुळे एकरी सहा ते सात मे. टनाने उत्पादन वाढते. सध्या बाळभरणीसाठी बैलचलित औजाराचा वापर होतो; पण पशुधनाची घटलेली संख्या पाहता, यंत्रावर चालणारे बाळ भरणी औजार विकसीत होणेची  गरज होती. 


क्रांती कारखाना मागील तीन - चार वर्षांपासून असे औजार विकसीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. आज स्वदेश ग्रुप, पुणे यांचे सहकार्यातून हे औजार उपलब्ध करून देणेत यश आले आहे. स्वदेश ग्रुपचे संस्थापक माधव बिरादार यांनी या औजाराची माहिती देताना सांगितले की, हे औजार २.५ व ३ एच.पी. मोटरवर असून या औजाराचे वजन ७५ किलो आहे. एकाच व्यक्तीच्या साहाय्याने या औजाराचा वापर करू शकतो व एकरी एक लिटर पेट्रोलमध्ये बाळ भरणी करता येते. सदर औजार कारखान्याच्या ऊस विकास योजनेतून शेतक-यांना उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व आभार कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी केले.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

 
𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰