yuva MAharashtra मुलांनी फुलाप्रमाणे प्रफुल्लित, आनंदी राहावे ..... न्यायाधीश सुनीता तिवारी ; कौटुंबिक न्यायालय रंगले... बालकांच्या किलबिलाटात...

मुलांनी फुलाप्रमाणे प्रफुल्लित, आनंदी राहावे ..... न्यायाधीश सुनीता तिवारी ; कौटुंबिक न्यायालय रंगले... बालकांच्या किलबिलाटात...




सांगली, दि. २९ (जि. मा. का.) : मुलांनी त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीकरिता फुलाप्रमाणे प्रफुल्लितआनंदीविवेकी जीवन व्यतीत करावे, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सुनीता तिवारी यांनी केले.

            कौटुंबिक न्यायालय सांगली यांच्या वतीने बालसुरक्षा सप्ताह अंतर्गत पक्षकारवकील वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या मुलांकरिता मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी  सामाजिक कार्यकर्ते वैभवी प्रेमलता संजय व रोहित वनिता गजानन यांनी मुलांसाठी विविध खेळ व गाणी घेतली. यामध्ये सर्व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



या कार्यक्रमांतर्गत सर्व सहभागी बालकांसाठी माणुसकीची भिंत या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. सर्व बालकांना त्यांच्या आवडीच्या अनेकविध वस्तू मिळाल्याने मुले आनंदीत झाली होती.

सूत्रसंचालन कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक ज्योती बावले भालकर यांनी केले तर आभार न्यायालयाच्या सहाय्यक अधिक्षक शैलजा वेदपाठक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालयाचे कर्मचारी विकास राऊतसंजय लोणकरमहेश खटावकरसुनीता चौगुलेश्रुती दुधगावकरशरद चांदवलेतृप्ती फासे आदिंनी परिश्रम घेतले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰