yuva MAharashtra भरघोस मतांचा आशीर्वाद देऊन मला पुन्हा एकदा जनसेवेची संधी द्या ; राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.डॉ.विश्वजीत कदम यांची भिलवडीकरांना साद..

भरघोस मतांचा आशीर्वाद देऊन मला पुन्हा एकदा जनसेवेची संधी द्या ; राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.डॉ.विश्वजीत कदम यांची भिलवडीकरांना साद..




भिलवडी दि. १६  : राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी भिलवडीत प्रचार दौरा केला. ग्रामदैवत हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. 'विश्वजीत दादा आगे बडो, हम तुम्हारे साथ है' च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. येथील प्रत्येक गल्लीत अन् प्रत्येक चौकात महिलांनी औक्षण केले. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात येत होते. सोबतीला हालगी-घुमके होतेच. त्यामुळे प्रचारात एक रंग चढला होता. गल्लीतील दोन्ही बाजूला रांगोळी काढली होती. डॉ.कदम हे प्रत्येक ग्रामस्थांशी संवाद साधत होते. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत होते. महिलावर्गाला आपला लाडका भाऊ दारात येणार असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. लहान मुले, महिला फोटो काढत होते. तरूण सेल्फी काढण्यात गुंग होता.



लोकनेते स्व.संग्राम दादा पाटील आणि ज्येष्ठ नेते आनंदराव भाऊ मोहिते यांचे दर्शन घेतले. आज ते आपल्यामध्ये प्रचार दौऱ्यात हवे होते अशी खंत डॉ.कदम यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले,
पलूस-कडेगाव मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत तुमच्या आशीर्वादाने भरपूर विकासकामे केली आहेत. मला भरघोस मतांचा आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा जनसेवेची संधी द्या. आपले प्रेम, विश्वास व आशीर्वादाचे हात यापुढेही कायम पाठीशी असू द्या अशी साद त्यांनी मतदारांना घातली. फुलांच्या वर्षावात केलेल्या जोरदार स्वागताने व उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पलूस-कडेगावमध्ये आपला मोठा विजय होईल व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चितच स्थापन होईल हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


ठिकठिकाणी थांबलेल्या ग्रामस्थांनी बाळासाहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही सोबत आहोत असा विश्वास दिला.
येथील असणाऱ्या प्रत्येक गल्लीत महापूर आणि कोरोना यात डॉ.विश्वजीत कदम यांनी भेट दिली होती. त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सांगली कारखान्याचे संचालक व भिलवडीचे प्रमुख नेते राजूदादा पाटील यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰