बेंबी मध्ये तेल घातल्याने कुठले फायदे होतात ?
गुडघेदुखी , सर्दी-पडसे तसेच त्वचाविकार. यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी बेंबीजवळ वेगवेगळ्या तेलांपैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारीक फायदे दिसतात. ही तेले नेहमी आपल्याकडे असतात. पण बेंबी मध्ये दोन तीन थेंब टाकून, बेंबीच्या जवळ फक्त दोन तीन थेंब लावून झोपल्यास बरेच विकार चुटकीसरशी दूर होऊ शकतात. मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात त्याची माहिती फारशी कुणाला नसते.
१} सांधेदुखी असेल, ओठ फाटले असतील तर सरसोंचे (मोहरी)तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाकावेत, दोन थेंब बेंबीजवळ लावायचे. हा उपाय करताना थोडा चमत्कारीक वाटेल खरा, पण तो प्राचीन उपाय आहे. त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटने कायमचे बरे होईल.
२} सर्दी-पडसे तर कधीही होते. काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही. पण अशावेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये बुडवून तो आपल्या बेंबीजवळ फिरवायचा.सर्दीपडशावर हा रामबाण इलाज आहे. करून पहाच एकदा. जुन्यातील जुनी सर्दीही या लहानशा उपायाने बरी होते.
३} मुलगी असो की मुलं तारुण्यात चेहऱ्यावर मुरुमे येणं ठरलेलं आहे. फार त्रास होतो त्यावेळी. पण या समस्येपासून वाचायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोडय़ा थेंबांनी बेंबीभोवती मालीश करा. यामुळे मुरुमे तर गायब होतीलच, पण त्याबरोबरच त्वचाही डागविरहीत आणि सुंदर दिसू लागेल.
४} चेहरा स्वच्छ, चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडतात. पण त्यावरही सोप्पा उपाय करून पाहा. बदामाच्या तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टाकून, काहीथेंब बेंबीभोवती लावून पहा. झटपट परिणाम दिसेल. चेहरा चमकदार दिसेलच, पण रंगही उजळेल.
५} एवढेच कशाला, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टका, काही थेंब बेंबीजवळ लावून हळुवार हाताने मसाज करायचा. या उपायाने प्रजनन क्षमतेशी संबंधित कोणताही विकार असेल तर तो बरा होईल.
६} त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे वाटत असेल तर गावरान ,देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन दोन तीन थेंब बेंबीत टाकून, काही थेंब बेंबीजवळ लावायचे. त्वचा अगदी छोटय़ा बाळासारखी मऊ होईल.
७} मूळव्याध, भगेंदर, गॅस, पोट गच्च राहणे, पोटात जडपणा असणे, पोट साफ न होणे, गुडघे दुखणे, हे कमी व्हावे यासाठी नाभीमध्ये एरंड तेल वापरल्यास खूपच फायदा होईल.
माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ बेंबीशी संलग्न असते. त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ थोडे तूप चोळले तरी चांगला उपाय ठरतो.
टिप - दररोज संध्याकाळी झोपतांना प्रथम २-३ थेंब तेल नाभीमध्ये टाकावेत. बोटाने थोडा मसाज देऊन परत २-३ थेंब टाकावेत आणि झोपून जावे.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰