yuva MAharashtra नेचर फौंडेशन बुर्ली यांच्यावतीने पर्यावरण पूरक किल्ला स्पर्धा उत्साहात संपन्न ; तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद..

नेचर फौंडेशन बुर्ली यांच्यावतीने पर्यावरण पूरक किल्ला स्पर्धा उत्साहात संपन्न ; तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद..




   बुर्ली (ता.पलूस) दि. ११ : नेचर फौंडेशन यांच्यावतीने बुर्ली गाव आणि परिसरामध्ये भव्य अशा किल्ला स्पर्धा घेण्यात आल्या या किल्ला स्पर्धेमध्ये पर्यावरण पूरक किल्ला बनवणाऱ्या किल्ल्यास प्राधान्य देण्यात आले.


प्रथम क्रमांक -रॉयल कारभार ग्रुप (तोरणा)
 

द्वितीय क्रमांक- शिवशंभू ग्रुप (प्रतापगड) 


तृतिय क्रमांक- राजारामबापू ग्रुप (पुरंदर), 


चतुर्थ क्रमांक - शिवशक्ती ग्रुप (प्रतापगड) 


विशेष उत्तेजनार्थ क्रमांकाचे बक्षीस जिजामाता स्कूल (रायगड) यांना मिळाले. 

यावेळी विजेत्या आणि सर्व सहभागी स्पर्धकांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. सर्व सहभागी संघाना ट्रॉफी व प्रमाणपत्र, झाडे आणि पुस्तके भेट देण्यात आले. यावेळी ॲड.पवनकुमार शिंदे, ए.टी.पाटील, शेखर पाटील उपस्थित होते.


      किल्ला स्पर्धेचे आयोजन नेचर फाउंडेशनचे सैफअली नदाफ,कैलास पाटील,निरज पाटील,संतोष चौगुले, गणेश जाधव,प्रतीक जाधव,ओंकार खुडे,विशाल कोरे,अरमान नदाफ, संदेश चौगुले,निखिल पाटील,विनायक टोणपे,इरफान नदाफ,तुषार शिवदे, आकाश पाटील,अर्शद इनामदार यांनी केले होते.
        मोबाईल आणि टीव्ही मध्ये रमलेल्या मुलांना त्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी आणि आपल्या इतिहासाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी  या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी  करण्यात येते, तसेच तरुणांमध्ये असलेल्या किल्ला संवर्धनाच्या जाणिवेला योग्य दिशा लाभावी म्हणुन हा आमचा छोटासा प्रयत्न होता असे नेचर फौंडेशनचे अध्यक्ष सैफअली नदाफ यांनी सांगितले.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰