yuva MAharashtra क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंची १३ वी पुण्यतिथी

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंची १३ वी पुण्यतिथी



कुंडल (ता. पलूस) दि. ११  : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड ह्यांनी सातारा प्रतिसरकारच्या सशस्त्र लढ्याचे कुशल संघटक आणि तुफानसेनेचे फिल्डमार्शल म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय कामगिरी केली होती. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कष्टकरी, गोरगरीब, शेतकरी यांच्या न्याय्य हक्कांसाठी व जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून अनेक लढ्यांचे नेतृत्व केले.


 त्यांनी अविश्रांत परिश्रमातून शेती, शिक्षण, पर्यावरण, सहकार व जीवनाशी संबंधित क्षेत्रात रचनात्मक कार्याद्वारे भरीव योगदान देऊन या परिसरातील विकासाला एक नवी दिशा दिली. अशा थोर स्वातंत्र्यसेनानींची १३ वी पुण्यतिथी गुरुवार, दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४ रोजी साजरी होत आहे. पुण्यतिथीनिमित्त सकाळी ०९:३० वाजता क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, लि. कुंडल कार्यस्थळावरील त्यांच्या समाधिस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात येणार आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰