सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, अल्पेश लावंड आणि एस. व्ही. बागलगावे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि. दा. सारंगकर, डॉ. वैशाली पाटील, जिल्हा परिषद प्रतिनिधी एस. डी. भांबुरे, सहायक आयुक्त समाजकल्याण नितीन उबाळे आदिंसह समितीचे शासकीय, अशासकीय सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत पोलीस विभागाकडे दाखल व पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणे, मा. न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे, घडलेल्या गुन्ह्यातील अत्याचार पीडितांना आर्थिक मदत, गंभीर गुन्ह्यातील पीडित व्यक्तिंच्या वारसांचे पुनर्वसन आदि विषयांचा आढावा घेण्यात आला.
पोलिस विभागाकडील दाखल प्रकरणांचा तपास व आरोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही करणेबाबत तसेच जिल्हा सरकारी वकील यांना न्यायालयात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणेबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्देश दिले. तसेच, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना कागदपत्रांची पूर्तता असलेल्या प्रकरणांना अर्थसहाय्य मंजूर करुन सदर प्रकरणांना अर्थसहाय्य वितरीत करणेचे आदेशित केले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰