पलूस दि. १६ : येणार्या २० तारखेला विधानसभेची निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर मतदारांनी जास्तीत जास्त टक्के मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन सांगली जिल्ह्यातील पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय आणि जुनिअर कॉलेज पलूस यांचे वतीने मतदार जागृती प्रबोधनासाठी तयार करण्यात आलेल्या मानवी साखळीद्वारे करण्यात आले.
आपले मत अमूल्य आहे. संविधानाने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला आहे. आपल्या मताची शासन स्तरावर नोंद झाली पाहिजे. आपले मत वाया जाऊ नये तसेच बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना देखील मतदानासाठी येण्याचे व बहुसंख्येने उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन यावेळी पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय आणि जुनिअर कॉलेज पलूस यांचे वतीने करण्यात आले.
माध्यमिक व ज्युनिअर विभागाकडील सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांनी GO VOT हा संदेश देणारी मानवी साखळी तयार करुन " मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो " अशा अनेक घोषणा देऊन मतदारांना संदेश दिला.
या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. तानाजी करांडे सर व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
तसेच मतदार जनजागृतीसाठी संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे , उपाध्यक्ष विश्वास रावळ, सचिव शहा साहेब , सुनील रावळ तात्या यांचे मार्गदर्शन लाभले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰