yuva MAharashtra सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 13 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 13 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत



 

        सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : सेवा सहकारी संस्थांना कामे वाटपासाठी वाहन चालकाची 03 कामे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाकडे प्राप्त झाली आहेत. ही कामे करण्यास इच्छुक असणाऱ्या तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्र व आवश्यक कागदपत्रांसह दि. 13 डिसेंबर 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

            शिराळा तालुक्यातील सहाय्यक अभियंता श्रेणी-1 वारणा डावा तीर कालवा उपविभाग क्र. 1 कोकरूड, उपविभागीय अभियंता वारणा प्रकल्प उपविभाग क्र. 3 वारणावती व उपविभागीय अभियंता वारणा डावा तीर कालवा उपविभाग क्र. 2 यांच्याकडील प्रत्येकी एक वाहन चालक (परवाना आवश्यक वय 18-58 वर्षेपर्यंत)  काम असून कामाचा कालावधी 11 महिन्याचा आहे. मासिक मानधन प्रत्येकी 13 हजार 330 रूपये आहे.

            बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस 3 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/ राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमित वार्षिक लेखापरीक्षण केलेले असावे. सन 2023-24 चे लेखापरीक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/ लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्रे देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे सदर सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्या ठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकित प्रती/प्रमाणपत्र मूळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. ज्यांचे कार्यक्षेत्र शिराळा आहे तसेच जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या संस्थांनी अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकित प्रत जोडावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰