yuva MAharashtra जिल्हा उद्योग केंद्राकडील कामांसाठी संस्थांनी 13 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव द्यावेत

जिल्हा उद्योग केंद्राकडील कामांसाठी संस्थांनी 13 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव द्यावेत



 

        सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : सेवा सहकारी संस्थांना कामे वाटपासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाकडे काम प्राप्त झाले आहे. सदर काम करण्यास इच्छुक असणाऱ्या तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्र व आवश्यक कागदपत्रासह दि. 13 डिसेंबर 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

            जिल्हा उद्योग केंद्राकडील सुरक्षा रक्षक, साफसफाई, हाऊस किपिंग, उद्योग भवन देखभाल दुरूस्ती, पाण्याची टाकी स्वच्छता दुरूस्ती, सांडपाणी निचरा, मल:निस्सारनाची कामे तसेच वेळोवेळी उदभवनारी इतर अनुषंगिक कामे असून कामाचा कालावधी 1 वर्षाचा आहे तर मासिक मानधन 80 हजार रूपये आहे.

            बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस 3 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/ राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमित वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2023-24 चे लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/ लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्रे देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशिल नसतील त्यांची नावे सदर सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्या ठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकित प्रती/प्रमाणपत्र मुळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. ज्यांचे कार्यक्षेत्र सांगली आहे तसेच जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या संस्थांनी अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकित प्रत जोडावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰