मुंबई, दि. 16 : मुख्य न्यायदंडाधिकारी मुंबई या कार्यालयातील मारुती स्विफ्ट डिझायर (पेट्रोल) हे वाहन जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. या वाहनाचा लिलाव दि. 18 डिसेंबर 2024 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, महापालिका मार्ग, मुंबई 400001 येथे होणार असून दि. 17 डिसेंबर 2024 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पहावयास मिळेल.
या वाहनाची बोलीची सुरुवातीची किंमत 60 हजार एवढी आहे. अधिक माहितीकरिता सहा. प्रबंधक (लेखनसामग्री) मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, मुंबई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे मुख्य न्यायदंडाधिकारी, एस्प्लनेड यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰