yuva MAharashtra रमाई आवास योजना घरकुल पूर्णत्वाचे दाखले वितरणासाठी 20 डिसेंबरपासून कार्यशाळा

रमाई आवास योजना घरकुल पूर्णत्वाचे दाखले वितरणासाठी 20 डिसेंबरपासून कार्यशाळा



 

        सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : रमाई आवास योजनेतील लाभार्थींना घरकुल पूर्णत्वाचे दाखले विनाशुल्क मिळवून देण्यासाठी दि. 20 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका कडील नगररचना कार्यालये येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावेअसे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.

        सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील व्यक्तिंना घरकुल बांधकाम करण्यासाठी रमाई आवास योजनेतून अनुदान दिले जाते. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन 2010-11 पासून ही योजना कार्यान्वित आहे. या योजनेतून लाभ झालेल्या लाभार्थींपैकी बऱ्याच लाभार्थींकडून पूर्णत्वाचे दाखले सादर केले गेले नसल्याने सदर घरकुले अपूर्ण दिसून येत आहेत. यावर उपाय म्हणून महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी या लाभार्थींना घरकुल पूर्णत्वाचे दाखले विनाशुल्क मिळवून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करून सदर दाखले विनाशुल्क देण्याबाबत आदेश दिले आहेत.

            या कार्यशाळेमध्ये नगररचना कार्यालयाच्या शाखा अभियंता याचबरोबर जिल्ह्यातील खासगी अभियंते जे हे काम करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनीही उपस्थित राहून सदर पूर्णत्वाचे दाखले देण्यासाठी विनाशुल्क सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.

        कार्यशाळेमध्ये सहभागी होवून मंजूर लाभार्थी यांनी पूर्णत्वाचा दाखला सादर करण्यासाठी त्यांच्यासोबत मंजूर बांधकामाचा आराखडा, विहित नमुना अर्जमहानगरपालिका बाग विभागाकडील पाच झाडे लावलेबाबतचा दाखला, आरोग्य विभागाचा दाखलाबांधकाम मंजुरीबाबतचा परवाना व नकाशापूर्णत्वाचा दाखला मिळण्याकामी महानगरपालिका कार्यालयाकडील विहित नमुन्यातील अर्जबांधकाम आराखडा मंजुरीचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रे घेवून सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका कडील नगररचना कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे व सदर घरकुले पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰