सांगली, दि. ३ (जि. मा. का.) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयं सहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याच्या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी दि. 27 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक बचत गटांनी मुदतीत परिपूर्ण अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सन 2012-13 या आर्थिक वर्षापासून सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांकडून खालील निकषानुसार व आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत मार्गावण्यात आले होते. तथापि ज्या बचतगटांना मुदतीत अर्ज भरता आले नाहीत, त्यांना योजनेचा अर्ज भरण्यासाठी दि. 27 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
योजनेचे निकष
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती घटकातील असावेत. स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचत गट नोंदणीकृत असावा.
प्रस्तावास आवश्यक कागदपत्रे
स्वयंसहाय्यता बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र (तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती इ.). स्वयंसहाय्यता बचत गटाच्या नावे असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स व या खात्याशी अध्यक्ष व सचिव यांचे आधारलिंक असलेचा पुरावा. स्वयंसहायता बचत गटाचा ठराव व सभासद यादी. स्वयंसहायता बचत गटातील सर्व सदस्यांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे दाखले. स्वयंसहायता बचत गटातील सर्व सभासदांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले रहिवासी पुरावे (डोमेसाईल). स्वयंसहायता बचत गटातील सर्व सभासदांचे आधारकार्ड झेरॉक्स. 100 रूपये स्टँपवर ट्रॅक्टर खरेदीबाबतचे हमीपत्र. सर्व कागदपत्रे साक्षांकित केलेली असावीत.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता इच्छुक बचत गटांनी दि. 27 डिसेंबर 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. उबाळे यांनी केले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰