yuva MAharashtra जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज 31 जानेवारी 2025 अखेर सादर करा - संशोधन अधिकारी मेघराज भाते

जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज 31 जानेवारी 2025 अखेर सादर करा - संशोधन अधिकारी मेघराज भाते



        सांगलीदि. 6, (जि. मा. का.) : सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षात यत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये  पदविका तृतीय वर्षात शिकत असलेल्या अनुसूचित जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग
विशेष मागास प्रवर्ग  सा.शै.मा.प्र./मराठा (एससी, व्हीजे, एनटी, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी) या संवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी विहि नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी केले आहे.

            सन 2025-26  या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकीवैद्यकीयकृषीपशुसंवर्धनवास्तुशास्त्रफार्मसीविधी (3 वर्षे / 5 वर्षे विधी), बी.बी.ए., बी.सी.ए., एम.बी.ए., एम.सी.ए.  बीड्त्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित विद्यार्थ्यास प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करणे अत्यावश्यक असतेत्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज 31 जानेवारी 2025 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांनीही विद्यार्थीपालक यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करुन समितीकडे मुदतीत अर्ज सादर करणेबाबत सूचना निर्गमित कराव्या, असे पत्रकात म्हटले आहे.

            अर्जदारांनी www.barti.maharashtra.gov.in cast validity या संकेतस्थळावर विहि नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावामहाविद्यालयीन शिफारसपत्र, 15 ए फॉर्मवर प्राचार्यांची सहीशिक्का  चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्रजातीविषयक सर्व पुरावे  विहि नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावे  ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी कागदपत्रांच्यापुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह समितीकडे सादर करावे.  अर्ज सादर करतेवेळी अर्जदारपालक यांनी समक्ष मू कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. भाते यांनी केले आहे.




🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰