yuva MAharashtra शासनाच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणामध्ये ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांना सामावून घ्यावे .....राजू पाटील

शासनाच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणामध्ये ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांना सामावून घ्यावे .....राजू पाटील





सांगली दि. ०१ : शासनाच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणामध्ये ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांना सामावून घ्यावे कारण आज पर्यंतच्या शासनाने ऊस वाहतूकदार शेतकरी बांधवांना कोणत्याही पद्धतीने मदत दिलेली नाही त्यामुळे ऊस वाहतूकदार घटक हा उध्वस्त झालेला आहे. आणि देशोधडीला लागून व्यवसाय मोडकळीत आलेला आहे. शासन कित्येक कोटी रुपये साखर कारखानदारांना मदत करत असते, परंतु या ऊस वाहतूकदार शेतकरी बांधवांच्या कडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नसल्यामुळे व या साखर व्यवसायामध्ये कोणत्याही पद्धतीचे ऊस वाहतूक व्यवसायासाठी कायदा केला नसल्यामुळे वाहतूकदारांना कायद्याच्या चाकोर्यात बसवले नसल्यामुळे अशा   शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व ढिसाळ कायद्यामुळे काही फसव्या ऊस तोडणी मुकादम मंडळीने वाहतूकदारांचे टोळ्या बांधण्यासाठी ॲडव्हान्स घेऊन  पसार झाल्यामुळेच ऊस वाहतूकदार पुरता हाताश झालेला आहे . त्यामुळे साखर कारखानदारांचे आडवांस घेतलेली रक्कम परत करता आलेले नसल्यामुळे तसेच  काही बँका पतसंस्था वित्त संस्थांचे ऊस वाहतूकदारांना हमी पत्राद्वारे कर्ज घेतलेले परत  करणे जमलेच नसल्यामुळे या साखर कारखानदारांनी व या बँकांच्या वसुलीसाठी संबंधित ऊस वाहतूकदारांनाची वाहने ओढून नेने जामीनदारांचे ऊस बिलातून पैसे वसूल करणे अशा अनेक त्रासाला कंटाळून कित्येक ऊस वाहतूकदारांच्या वर करारापोटी घेतलेल्या चेकचा गैर उपयोग करून सिक्युरिटीचे चेक वसुलीला वापरून वसुलीसाठी चेक दिलेत असे खोटे 138 सारखे गुन्हे दाखल केल्यामुळे कित्येक ऊस वाहतूकदार आत्महत्या केलेले आहेत आणि काही करण्याच्या मनस्थितीत असल्यामुळे शासनाने या ऊस वाहतूकदार घटकाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे अशी नम्र विनंती करत आहोत..राजू पाटील महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटना अध्यक्ष


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰