VIDEO
कडेगाव : मानवी हक्काची सुरुवात ही कर्तव्याच्या जाणिवेतून होते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य निष्ठेने व सचोटीने पार पाडले तर मानवी हक्काची पायमल्ली कधीच होणार नाही असे मत गोवा राज्याचे लोकायुक्त व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टीस श्री अंबादास जोशी यांनी व्यक्त केले.
10 डिसेंबर मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ''मानवी हक्क दिन व विशेष गुणगौरव '' समारंभ कृषी महाविद्यालयात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होती.
याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की सरकारी कार्यालय मध्ये प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करंन, हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगली सेवा देणे किंवा शेतकऱ्यांसाठी निकोप बियाणे देणे त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे सुद्धा मानवी हक्कांचे काम आहे.
कार्यक्रमात कडेगाव तहसीलदार अजित शेलार म्हणाले की प्रत्येक व्यक्तीच्या मानवी मूल्यांची जोपासना झाली पाहिजे पण आपल्या हक्क व अधिकार यांचा दावा करताना आपल्या कर्तव्याच्या विचार करायला पाहिजे. महाविद्यालयातील विद्यार्थिनी आपल्या जबाबदारींचे भान ठेवून वाटचाल करायला हवी त्यामध्ये आपल्या कुटुंबाचं व आपल्या महाविद्यालयाचाही हित आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव यांनी कृषी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेताना भविष्यात महाविद्यालयाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष, प्रा.श्रीकृष्ण मोहिते यांनी केले. सुरुवातीस डॉ.पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन आ.मोहनराव कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली., यावेळी सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव तसेच विकास खबाली, रणधीर कांबळे, भानुदास पाटील, चंद्रशेखर क्षीरसागर यांचा सत्कार जस्टीस अंबादास जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे डेप्युटी रजिस्टर डॉ.निलेश बनसोडे, उपप्राचार्य डॉ.रणवीर पवार, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, अनवर( आप्पालाल) इनामदार, उपाध्यक्ष,कृष्णा म्हेत्रे, केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ते चंद्रशेखर क्षीरसागर, मिरज शहराध्यक्ष,मारुती बोरनावळ, बबन तळकिरे, ग्राहक पंचायत चे प्रदीप जाधव, विशाल टेके, राजासाब इनामदार, अमोल लाड, डॉ. उमेश जमदाडे, महेश माने कैलास दाबाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ. युवराज जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत बुरुंग यांनी केले.
हेही पहा -----
https://youtu.be/QDrtggBBC2g?si=V1K43rPMTm199Qmt
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🌐 www.theJanShaktiNews.in
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰