yuva MAharashtra जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी



 

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे डिसेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 16 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांनी दिली.

            समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावेतसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारीअडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामूहिक स्वरूपाचे तक्रार अर्ज  स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्रीमती वर्षा पाटील यांनी केले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰