कुंडल (ता. पलूस) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि, कुंडल यांच्या ऊसविकास योजनेतून ऊस उत्पादक शेतक-यांना यंत्रचलित बाळभरणी औजाराचे वितरण आमदार अरूण लाड यांचे शुभहस्ते करणेत आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन शरद लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, संचालक दिलीप थोरबोले, जयप्रकाश साळुंखे, वैभव पवार, जितेंद्र पाटील, संग्राम जाधव, सुकुमार पाटील, सुभाष वडेर, शितल बिरनाळे, अनिल पवार, अशोक विभूते, संजय पवार, रामचंद्र देशमुख, विजय पाटील, माजी संचालक पोपटराव संकपाळ, कुंडलिक थोरात, संदीप पवार, कृष्णा कारखान्याचे संचालक बाबा शिंदे, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, सेक्रेटरी विरेंद्र देशमुख, विश्वजित पाटील, संभाजी बाबर, नितीन लाड, संभाजी लाड व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार अरूण लाड म्हणाले कि, "ऊसशेतीमधील मजूर टंचाई, वाढता लागवड खर्च व योग्य वेळेत काम पुर्ण होणेची गरज लक्षात घेता, शेतीमध्ये पुर्ण यांत्रिकीकरणाची गरज आहे. ऊसातील इतर कामासाठी सद्या लहान-मोठी यंत्रे उपलब्ध आहेत परंतु ऊस लागणीनंतर, ५०/६० दिवसांनी बाळभरणी करणेसाठी लहान यंत्राचा पर्याय उपलब्ध नव्हता. शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन, कारखान्याने मागील २/३ वर्षे प्रयत्न करून, यंत्राव्दारे बाळभरणी करणारे औजार विकसित केले आहे. थोर स्वातंत्र्य सैनिक क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू यांच्या १०२ वी जयंती दिवशी हे औजार शेतक-यांना उपलब्ध करून देत आहे.
या औजारामुळे शेतक-यांचे कष्ट कमी होतील, वेळ वाचेल व खर्चात बचत होणार आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, "ऊसाचे कमीत-कमी खर्चात उत्पादन वाढविणेसाठी कारखान्याचा ऊसविकास कार्यक्रमातून अनेक योजना शेतक-यापर्यंत पोहचवण्याचा नेहमी प्रयत्न केला जात आहे यामध्ये जास्तीत-जास्त शेतक-यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ऊसविकास अधिकारी विलास जाधव यांनी केले, आभार अॅग्री, ओव्हरसियर हर्षल पाटील यांनी मानले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰