सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त दि. 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याकांना हक्कांची जाणीवजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अशोक पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. जिल्हास्तरीय अल्पसंख्याक हक्क समितीच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशिर हक्काची जाणीव याची माहिती देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या भारतीय संविधानातील तरतुदी व त्यांचे फायदे या विषयावर डॉ. अजित पाटील, अल्पसंख्याक नागरिकांचे हक्क व त्यांच्या संरक्षणासाठीचे असणारे फायदे या विषयावार ॲड. फारूक कोतवाल आणि अल्पसंख्याक समाजातील प्रश्न व त्यावरील उपाययोजना या विषयावर डॉ. अब्दुलमजिद इनामदार यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच विविध शासकीय विभागांमार्फत अल्पसंख्याक समुदायाकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰