सांगली, दि. २ (जि. मा. का.) : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दि. ३ डिसेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील अस्थिव्यंग, मूकबधीर, मतिमंद, अंध विद्यार्थ्यांच्या शाळांतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम डेक्कन मॅन्युफॅक्चुरर्समध्ये असोसिएशन हॉल, माधवनगर रोड सांगली येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत संपन्न होत आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल आदिंची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दि. ११ डिसेंबर रोजी दिव्यांग विद्यार्थी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुल मिरज येथे होणार आहेत. ही माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी दिली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰