भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
भिलवडी (ता.पलूस) : तणावमुक्त व आनंदी राहण्यासाठी,
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मोबाईलशी नव्हे तर खेळांशी मैत्री करा असे आवाहन भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सीमा शेटे यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे होते.यावेळी बोलताना महावीर वठारे म्हणाले की,खेळांमुळे आपणांस उत्तम आरोग्य लाभते.पुस्तकी ज्ञाना सोबत कोणत्याही एका खेळ प्रकारात प्राविण्य मिळवा.
यावेळी शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले.क्रीडा विभाग प्रमुख संजय पाटील यांनी अहवावालचन केले.शरद जाधव यांनी सूत्रसंचालन तर विठ्ठल खुटाण यांनी आभार मानले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक शेटे,सौ. सांध्याराणी भिंगारदिवे,प्रगती भोसले,अर्चना येसुगडे,सारिका कांबळे, प्रियांका आंबोळे,मेघना शेटे,विद्या नाईक,अर्चना मोकाशीआदींसह,
पालक,विद्यार्थी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰