सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : येत्या 24 डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या नियोजनाची पूर्वतयारी बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव आशिष बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वर्षीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनासाठी केंद्र शासनाकडून व्हर्च्युएल हिअरींग अँड डिजीटल अक्सेस टू कन्झुमर ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांमध्ये ग्राहक कायदे तसेच केंद्र शासनाने निश्चित केलेल्या संकल्पनेवर जनजागृती होण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अन्नधान्य वितरण अधिकारी आशिष फुलुके, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके, सहायक आयुक्त ( अन्न ) रा. अ. समुद्रे, कृषि उपसंचालक धनाजी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, मोटार वाहन निरीक्षक श्रीमती शीतल काटे व ग्राहक संघटनेशी संबंधित डॉ. ज्ञानचंद्र पाटील, ॲड. अनिल ताडे, संजय कोरे, शाहीन शेख, दुष्यंत माने, सुरेश भोसले, सुरेश टेंगले आदि पदाधिकारी उपस्थित होते.
ग्राहक म्हणून प्राप्त असणाऱ्या सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळवण्याचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, बाजू ऐकून घेतला जाण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आदि हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने ग्राहकांनी शासनाला सहाय्य करण्याबाबत तसेच जबाबदाऱ्या व कर्तव्ये अंतर्गत पावतीशिवाय माल खरेदी करताना किंमत व गुणवत्ता तपासून घेणे, तक्रार निवारणासाठी योग्य ठिकाणी दाद मागणे शिकावे, स्वतःची फसवणूक होऊ नये, म्हणून काळजी घेणे याबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी मौलिक सूचना केल्या.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰