कुंडल ग्रामपंचायतच्या वतीने शोकसभेचे आयोजन
कुंडल (ता. पलूस) : भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी, २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी निधन झालं. याच पार्श्वभूमीवर कुंडल ग्रामपंचायतीच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. गावातील नागरिकांच्या वतीने भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यावेळी म्हणाले, एक अर्थमंत्री म्हणून आणि नंतरच्या काळात पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी देशाच्या विकासात दिलेल्या प्रचंड योगदानाची आठवण या निमित्तानं होणं स्वाभाविकच आहे. आज भारतानं जो आर्थिक विकास साधला आहे, उद्योगधंद्यांचा जो विस्तार झाला, तसंच जागतिक स्तरावर एक बलशाली राष्ट्र म्हणून भारताची जी ओळख निर्माण झाली, त्यामध्ये मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांचा, त्यांच्या दूरगामी निर्णयांचा मोठा वाटा आहे.
आर्थिक क्षेत्राच्या पलीकडे, शिक्षण क्षेत्र, परराष्ट्र धोरण, सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार याबाबतीत त्यांचं योगदान देशाला कधीही विसरता येणार नाही. आणि म्हणून मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी.
या शोकसभेस कुंडल ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰