सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : अल्पसंख्याक हक्क दिन दि. 18 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) अरविंद बोडके, तहसिलदार सर्वसाधारण लीना खरात, समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे नोडल अधिकारी सलीम नदाफ तसेच अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनेशी संबंधित इतर शासकीय विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाच्या निमित्त्ताने अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाव्दारे अल्पसंख्याक समाजाविषयी राबविण्यात येणाऱ्या योजना, प्रधानमंत्री यांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमामधील योजना आदि योजनांच्या अनुषंगाने संबंधित शासकीय विभागाने वर्षभरात केलेल्या कामांची माहिती इत्यादीचे सादरीकरण कार्यक्रमामध्ये करण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या. अल्पसंख्याकांसाठी राबवण्यात येत असलेल्या सर्व योजनांची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्याबाबतच्या सूचनाही सर्व विभाग प्रमुखांना यावेळी त्यांनी दिल्या.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰