सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड अंतर्गत केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते, मत्स्यव्यवसाय व मत्स्यव्यवसाय अनुषंगिक कामांशी प्रत्यक्ष सहभाग असलेले कामगार यांची नोंद करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक सुविधा केंद्रामध्ये नोंदणी करण्याची सोय उपलब्ध असून याचा लाभ मत्स्य व्यावसायिकांनी घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) अमर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक सुविधा केंद्रामध्ये (CSC) व जिल्हा कार्यालयात सर्व मच्छिमार तसेच मत्स्यव्यवसाय संलग्न यांची NFDP (National Fisheries Digital platform ) नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसेच https//-nfdp.dof.gov.in या संकेतस्थळावर जाऊन वैयक्तिकरित्या मच्छिमार नोंदणी करु शकतात.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत राज्यातील मच्छिमारांचा विनामूल्य अपघात गट विमा उतरविला जातो. या घटकांमध्ये मच्छिमारांसमवेत मत्स्यव्यवसायातील कामगार, मत्स्यसंवर्धक तसेच मत्स्यव्यवसायाशी निगडीत बाबींमध्ये प्रत्यक्ष संबंध असलेले व्यक्तीसुध्दा समाविष्ट होण्याची तरतूद आहे. विमा उतरविण्याकरिता मच्छिमार 18 ते 70 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी दाव्याची रक्कम मृत्यु किंवा कायमस्वरुपी अपंगत्व (PTD) प्रकरणी 5 लाख रूपये, कायमचे अंशिक (PTD) अपंगत्व यासाठी 2 लाख 50 हजार रूपये अशी आहे.
या विमा पॉलिसीअंतर्गत समुद्र / रस्ते / रेल्वे इत्यादिंवरील अपघात, पाण्यात बुडणे/गायब होणे, विषारी पदार्थ हाताळल्यामुळे अपघात, आग, विजेचा झटका किंवा विजेचा धक्का व मशीनवर काम करताना अपघात याप्रमाणे दावे स्वीकारण्यायोग्य असतील.
वारसदाराने विमा दावा रक्कम मिळण्यासाठी अपघाताच्या तारखेपासून 120 दिवसांच्या आत GAIS Portal वर दावा करणे आवश्यक असून अपघाताच्या तारखेपासून 180 दिवसांच्या आत दाव्याची मूळ कागदपत्रे विमा कंपनीकडे योग्य मार्गे सादर होणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सहाय्य्क आयुक्त् मत्स्यव्यवसाय (तां) सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, कक्ष 108 विजयनगर सांगली, दूरध्वनी क्रमांक-0233/2600031 येथे संपर्क साधावा, असे पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰