yuva MAharashtra पशुगणना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करा - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

पशुगणना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करा - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे




          सांगलीदि. ३ (जि. मा. का.) : पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहेत्यानुसार रोगप्रतिबंधक लसीकरणासाठी लसमात्रा व उपचारासाठी औषधांचा पुरवठा केला जातो. यासाठी पशुगणना अत्यंत महत्त्वाची आहे. पशुगणना हे राष्ट्रीय कर्तव्य समजून करावीअसे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.



शेतकरी भवन मिरज येथे प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यासाठी आयोजित 21 वी पशुगणना जिल्हास्तरीय द्वितीय प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सांगली डॉ. अजयनाथ थोरेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. सांगली डॉ. सतीशकुमार  जाधवमहानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. रविन्द्र ताटेसहा आयुक्त. डॉ. महादेव गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.



मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्यापशु आरोग्य नियंत्रणासाठी प्रयोगशाळांची गरजविस्तार सोबत प्राणिजन्य आजार रोखण्यासाठी व मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पशुगणना आकडेवारीचा उपयोग होईल. नीती आयोगवेगवेगळ्या संशोधन संस्थाआंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्र सांख्यिकी विभागजागतिक व्यापार संघटनाखाद्य व कृषी संस्था यासारख्या संस्थानादेखील हा डाटा उपयोगी पडणार आहे. त्यामुळे पशुगणनेचे महत्व खूप मोठे आहे. त्यामुळे प्रगणक व पर्यवेक्षक यांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून पशुगणना करावीअसे त्या म्हणाल्या.

 यावेळी डॉ सतीशकुमार जाधव यांनी पशुगणना बाबत प्रशिक्षण दिले व महानगरपालिका आरोग्य आरोग्य अधिकारी रविंद्र ताटे यांनीही मार्गदर्शन केले.

 पशुसंवर्धन विभागामध्ये दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. यामध्ये प्रामुख्याने गायवर्गम्हैसवर्गशेळीमेंढीकुक्कुटबदकटर्कीहत्तीससेडुक्करेउंटघोडागाढवकुत्रा इत्यादी 16 प्रजातींचा समावेश होतो. यामध्ये पशुधनाच्या संख्येची नोंद मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र ॲपची निर्मिती केलेली आहे.

केंद्र पुरस्कृत २१ वी पंचवार्षिक पशुगणना २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत नेमलेले प्रगणक घरी आल्यानंतर पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनांची अचूक माहिती पशुप्रगणकांना द्यावी. जिल्ह्यात पशुगणना करण्यासाठी ग्रामीण भागासाठी 155 प्रगणक व 24 पर्यवेक्षक नियुक्त केलेले आहेत. तसेच शहरी भागासाठी 47 प्रगणक व 12 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पशुगणना मोबाईल ॲपद्वारे करण्यात येत असून तीन महिन्यात पूर्ण करणे आवश्यक आहे. या 21 व्या पशुगणनेसाठी पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची प्राधान्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰