सांगली, दि. ३ (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेकरिता इच्छुक लाभार्थींनी शासन निर्णयात नमूद सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक 9 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰